नाही म्हणता म्हणता तुझी आठवण येतेय मी तुला
मिस करतेय हे आता मी कबुल करायला लागलेय इतरांसमोर...
परवा असंच आई समोर न जाणे कितव्यांदा हे
बोलले- ती हसून म्हणाली- “ अरे तू तर पूर्वी म्हणायचीस.. मला शिप वरचा नवरा हवाय
म्हणून...म्हणजे ६ ६ महिने बाहेर- मी मजेत
राहीन...”
चिडून काहीतरी बोलले असते तिला- तेव्हाचं
तेव्हा- आता मी मोठी झाले वगैरे- पण नुसतंच हसून म्हटलं – “हे असं म्हणायचे तेव्हा
इतका INTRESTING नवरा मिळणार आहे हे कुठे माहित होतं?”
ती आश्चर्य न लपवता हसून म्हणाली- “इतका INTRESING
आहे नवरा?”
निश्वास टाकून म्हंटलं- आहे खरा....
MISS YOU MY INTERESTING HUSBAND...

Miss you too ga....
ReplyDelete