Thursday, 24 April 2014

याद आ रही है...


नाही म्हणता म्हणता तुझी आठवण येतेय मी तुला मिस करतेय हे आता मी कबुल करायला लागलेय इतरांसमोर...
परवा असंच आई समोर न जाणे कितव्यांदा हे बोलले- ती हसून म्हणाली- “ अरे तू तर पूर्वी म्हणायचीस.. मला शिप वरचा नवरा हवाय म्हणून...म्हणजे  ६ ६ महिने बाहेर- मी मजेत राहीन...”
चिडून काहीतरी बोलले असते तिला- तेव्हाचं तेव्हा- आता मी मोठी झाले वगैरे- पण नुसतंच हसून म्हटलं – “हे असं म्हणायचे तेव्हा इतका INTRESTING नवरा मिळणार आहे हे कुठे माहित होतं?”
ती आश्चर्य न लपवता हसून म्हणाली- “इतका INTRESING आहे नवरा?”
निश्वास टाकून म्हंटलं- आहे खरा....

MISS YOU MY INTERESTING HUSBAND...

1 comment: