Wednesday, 23 April 2014

मेरा मन तेरा प्यासा...

" आला आला ओकांचा फोन.. फोनु वाजे रुणुझुणु... वा वा... आदित्य ओक, आय लव्ह यु... कारण तुम्ही आम्हासी फोन करून महाराजांच्या पायउतार होण्याची सुवार्ता दिलीत- समोर असतात तर गळ्यातला पाणीदार मोत्यांचा कंठा काढून दिला असता...
इतकं बरं वाटलं ना... आता जयने literally महिनाभर कॉल केला नाही तरी चालेल... आपल्या माणसाच्या सुखरूप पोहोचण्याची खबर आपल्याला एखादं award मिळालंय ह्या न्यूज पेक्षा मोठी असते.. सुंदर असते-

.... तळटीप- आत्ता जयचाच फोन आला- त्याचा तो अतिपरिचित, सुमधुर, पुरुषी आणि मायाळू “हां आशु.....-“ असा आवाज कानावर पडला आणि क्षणभर आनंदाने डोळेच मिटून घेतले मी- चेह-यावर कालवण भात खाताना येतं तसं हसू पसरलं... जय... you dont know how much i love u...
मेरा मन तेराsssss प्यासा..sssss


No comments:

Post a Comment