Tuesday, 22 April 2014

happy(?!#@$%&*) realisation!

आता मला कळलं जय...
पुरुष बायकांना पोरं देऊन अडकवत असतीलही...
पण जे पुरुष कामासाठी सतत आणि सतत आणि सतत बाहेरच असतील, असतात-
त्यांच्या बायका हातापाया पडून त्यांच्याकडून पोर मिळवत असतील...
ज्याच्यावर आपलं इतकं प्रेम आहे तो समोर नाही तर त्याच्या तोंडवळ्याचं कोणीतरी......
मला इतकं काम आहे तरी मध्येच सुन्नपणा येतो-
कोणी काही म्हणत नाही- तरी खरंच घर खायला उठतं...
आशु आशु करत कोणी सतत हाका मारत नाही... तरीही काम करता करता हात अवचित थांबतो...
उगाच खोल्यातून फिरून येते मी...
कोणी आहे असं वाटून...
सगळ्यात कहर काल रात्री- आज पहाटे...
उगाच मध्येच झोप चाळवली... आणि............
भास झाला क्षणभर...
तू झोपला आहेस बाजूला...
एक सेकंद मी आईशप्पत सुखावले-
विचारही आला नाही मनात की तू कसा असशील...
तू परत येऊन झोपला असशील तर तुझी टूर... तिचं काय झालं?
काही नाही- फक्त एक स्वार्थी सुखाची लहर गेली...
तू .. आला आहेस... येणारच होतास. आहेसच बाजूला-
अचानक हाती येणा-या orgasam च्या संवेदनांसारखं ते सुख चाखलं मी झोपेत...
आणि जाणवलं तू नाहीयेस, त्या उशा आणि तुझी गोधडी आहे...
कचकन काहीतरी तुटलं मनात.... उठून वेळ पाहिली तर घड्याळ झोपेतच बंद पडलं होतं-
धस्स झालं मनाला... उगाच नाही नाही ते विचार आले...
मग स्वतःलाच शांतावत झोपले...

मिस यु यार...

No comments:

Post a Comment