पेपर येऊन पडलाय... मला विचारतोय... मला कोण
वाचणार पुढचे दिवस?
मीच वाचून काढला मग... तुझ्या वतीने.
झाडांना पण पाणी घातलं... त्यांना म्हटलं आता
मीच तुम्हाला... तुमच्यावर माया करायचे ते department त्याने घेतलं... आता माझ्या वाटणीची
माया पण तोच करायचा... जमवून घ्या हां...
चादरीच्या घड्या, कामवाल्या बायका, फ्रीज मधली
अंडी, चहा... सगळे मिस करतायेत तुला....
and this is just a day 01...
कठीण आहे सगळं...
कधी रे येशील तू...
जीवलगा..?

No comments:
Post a Comment