आपल्या आवडत्या
माणसाचं प्रेम आणि आपलं आवडतं काम दोन्ही गोष्टी आपला ऑक्सिजन असतात ना... तुला
तुझं आवडीचं काम करायला मिळतंय- आणि तुला माहितीये की इतक्या लांब कोणीतरी तुझी
इतकी वाट बघत झुरतंय.. दोन्ही गोष्टी खूप हव्याहव्याश्या आहेत.
आज मी सतीश सोबत काम
करत बसले आहे- म्हणजे मी सीसीडी मध्ये
बसले आहे. तो येईल आणि आम्ही कामाला सुरवात करू... मला आज खूप दिवसांनी बरं
वाटतंय... काम आणि ते सुद्धा आवडीच्या माणसासोबत आवडीचं काम ही आपल्या चेह-यावर
स्माईल आणणारी गोष्ट असते ना..
आणि मला हे पण
माहितीये की बॉडी शॉप मध्ये जाऊन तू माझ्यासाठी अल्मंड प्लस बटर वालं स्क्रब आणणार
... आणि इसिमियाके आणि जिओ आणणार आहेस... आणि तुला पण माझी थोडीफार आठवण येत
असणारे...
yaayaaaaaaaaaaaayyyayayayayaa...
No comments:
Post a Comment